खोटे कारणे सांगून मोबाईल लंपास करणारा गजाआड
By Admin | Updated: March 12, 2015 00:41 IST2015-03-12T00:41:43+5:302015-03-12T00:41:43+5:30
कधी पॉलीटेक्नीकचा विद्यार्थी तर कधी मेकॅनिक आहे, असे सांगत सांगणे व घरात प्रवेश करणे आणि नजर चुकवून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

खोटे कारणे सांगून मोबाईल लंपास करणारा गजाआड
ब्रह्मपुरी: कधी पॉलीटेक्नीकचा विद्यार्थी तर कधी मेकॅनिक आहे, असे सांगत सांगणे व घरात प्रवेश करणे आणि नजर चुकवून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. अतुल अरुण कावळे (२६) असे आरोपीचे नाव आहे.
निरनिराळ्या व्यसनामुळे निरनिराळी कृती करुन पैसा मिळविणे हा त्याचा व्यवसाय बनला होता. कधी मी पॉलिटेक्नीकचा विद्यार्थी आहे, तुमच्याकडे भाड्याने खोली आहे काय, असे विचारुन घरात प्रवेश घेणे, लगेचच पिण्याच्या पाण्याची मागणी करणे, पाणी आणायला गेले की, हॉल मधील मोबाईल ठेवला असेल तर तो लंपास करणे व पटकन निघून जाणे, कधी मी फ्रिज, टीव्ही मेकॅनिकल आहे म्हणून घरात प्रवेश घेणे व कुणाचीही नजर नसली की मोबाईल लंपास करणे हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होता.
आरोपीकडून पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. अवाजवी दरात मोबाईलचे पार्ट विकने व पैसे मिळविणे हा त्याचा गोरखधंदा जिवावर बेतल्याने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अनेक मोबाईल धारकांचे गेलेले मोबाईल या चोरीच्या उघडकीसने मिळण्याची शक्यता आहे. अतुल अरुण कावळे याला अटक करुन पोलीस हवालदार एस. सी, गोवर्धन, अनिल शेडमाके, खुशाल कुंभरे अधिक तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)