मोबाईलवरून होतेय बँक ग्राहकांची फसगत
By Admin | Updated: January 25, 2015 23:12 IST2015-01-25T23:12:19+5:302015-01-25T23:12:19+5:30
‘मी बँकेतून बोलत आहे. तुमचा एटीएम बंद होणार असून दुसरा नंबर मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या एटीएमवरील १६ अंकी नंबर व पिनकोड नंबर द्या. २४ तासांत दुसरा नंबर मिळेल’, असे मोबाईलवर सांगून

मोबाईलवरून होतेय बँक ग्राहकांची फसगत
चंद्रपूर : ‘मी बँकेतून बोलत आहे. तुमचा एटीएम बंद होणार असून दुसरा नंबर मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या एटीएमवरील १६ अंकी नंबर व पिनकोड नंबर द्या. २४ तासांत दुसरा नंबर मिळेल’, असे मोबाईलवर सांगून फसवणूक करणाऱ्या अज्ञात मोबाईलधारकांकडून यापुढे सावध असा. कारण तुम्ही त्याला प्रतिसाद दिला तर तुमचे आर्थिक फसगत होऊ शकते. गेल्या काही महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात अनेकांना असे दूरध्वनी आले आहेत. त्यातील काहींची फसगत झाली आहे. टेलिमार्केटिंगचा गैरवापर करून ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडत आहेत.
यासोबतच मोबाईलवर असे अनेक प्रकारचे मॅसेज आणि कॉल येत आहेत. ईश्वर आणि धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन विविध यंत्र विकण्याचा सपाटा सुरू आहे. एवढेच नाही तर दूरचित्रवाहिन्यांवरूनसुद्धा ग्राहकांना भुरळ घातली जात आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या वलयाचा फायदा घेत त्यांना फायदा झाला तुम्हालाही फायदा होईल, असे म्हणत, भाग्योदय यंत्र ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे. याला अनेक नागरिक बळीही पडत आहेत. यासोबतच लॉटरी लागल्याचे मेसेज किवा दूरध्वनीदेखील येत आहेत. त्याद्वारे तुमच्या अकांऊटची माहिती घेतली जाते. त्यातून ठगबाजी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. अशा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.(प्रतिनिधी)