रक्तदान शिबिर आयोजित करून मनसेने पार पाडली सामाजिक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:14+5:302021-04-19T04:25:14+5:30

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्याही रोडावली ...

MNS fulfilled its social responsibility by organizing blood donation camp | रक्तदान शिबिर आयोजित करून मनसेने पार पाडली सामाजिक जबाबदारी

रक्तदान शिबिर आयोजित करून मनसेने पार पाडली सामाजिक जबाबदारी

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्याही रोडावली आहे. परिणामी जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी लॅबमध्येही रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी भटकावे लागत आहे. रक्ताचा तुडवडा बघता येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जेसीआय बल्लारपूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, असलम खान, बळी शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी जेसीआय बल्लारपूर आरबीटच्या वतीने हितेश नथवानी, विक्रम अरोरा, शिल्पी नथवानी, हरीश मुथा, राजू जोशी व आदींची उपस्थिती होती.

कोरोना संकटामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी बहुतांज जण रक्तदानासाठी समोर येत नाही. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे नागरिक, सामाजिक संस्था, संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी समोर येऊन रक्तदान शिबिर घेतल्यास रक्ताची टंचाई दूर होईल, असे आवाहन मनसेच्या प्रतिमा ठाकूर यांनी केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

Web Title: MNS fulfilled its social responsibility by organizing blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.