मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडेसह सहाजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:35+5:302021-03-13T04:52:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दुर्गापूर : भटाळी कोळसा खाणीतील जीएनआर कंपनीत तोडफोड करणारा मुख्य आरोपी मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडेसह सहाजणांना ...

मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडेसह सहाजणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : भटाळी कोळसा खाणीतील जीएनआर कंपनीत तोडफोड करणारा मुख्य आरोपी मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडेसह सहाजणांना दुर्गापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
मनदीप रोडे, सुमीत करपे, प्रवीण केराम, संदीप अरडे, प्रफुल पिसुडे, राहुल मडावी, नितीन बावणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द भादंविच्या कलम १४३, १४७, ३२४, ३२५, ४४८, ४२७, ३९५, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांना रोजगार देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून मनदीप रोडे व त्याच्या कार्यकर्त्यांनी १७ फेब्रुवारीला जीएनआर कंपनीत जाऊन तोडफोड केली. यामध्ये संबंधित कंपनीचे मोठे नुकसान झाले. याकरणी आतापर्यंत ३२ आरोपींना दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शुक्रवारी अटक केलेल्या सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.