मनसेचा वनअधिकाऱ्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:23 IST2018-03-17T23:23:56+5:302018-03-17T23:23:56+5:30
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

मनसेचा वनअधिकाऱ्याला घेराव
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, मागील काही महिन्यांत अनेक वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. त्याबाबत जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाअध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्य वनसंरक्षकाला घेराव घालण्यात आला.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. मात्र अनेक दिवसांपासून बहुतेक वाघाचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, उन्हाळ्यात उष्णतेमुळे जवळपास ५ ते १० टक्के जंगलाचा ºहास होतो, त्यावर उपयोजना करुन जनजागृती करावी या मागण्यांसाठी वनअधिकाºयांना घेराव घालण्यात आला. तसेच काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात दुर्मिळ महाढोक पक्षी आढळून आले. मात्र त्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची संख्या वाढविण्यासाठी कोणतीही उपाययोजना विभागातर्फे करण्यात आली. यावर चर्चा करण्यात आली. तसेच वनविभागाला जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी वनअधिकाºयांना दिली.
यावेळी मनविसेचे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांनी वाघाचे वस्त्र परिधान करुन वाघांच्या होणाºया अकस्मात मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तर मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी वाघांच्या मृत्यूच्या कारण विचारले.
यावेळी महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, सचिव कोतपल्लीवार, राजू कुकडे, मनोज तांबेकर, शशिकांत शंभरकर, किशोर मडगुलवार, माया मेश्राम, ऋषिकेश बालमवार, सागर वेट्टी, प्रमोद लोनगाडगे, फिरोज शेख, प्रफुल मुसळे, अमन सिंग, देशमुख उपस्थित होते.