आमदारांनी घेतला उपाययोजनांचा आढावा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:11+5:302021-05-06T04:30:11+5:30
आढावा सभेस तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके, नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृऊबास सभापती आवेश पठाण, न. ...

आमदारांनी घेतला उपाययोजनांचा आढावा.
आढावा सभेस तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके, नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृऊबास सभापती आवेश पठाण, न. प. चे बांधकाम सभापती सचिन आकूलवार, तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, बीडीओ भषमे, आरोग्य अधिकारी डॉ. गावंडे, डॉ. श्रीकांत कामडी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बंटी भांगडिया यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला. लवकरच ऑक्सिजन कॉन्सेंस्ट्रेटर मशिन्स उपलब्ध करून देणार असून, ऑक्सिजन निर्मिती प्लांटसुद्धा काही दिवसांत उभारण्यात येईल, अशी माहिती दिली. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध असलेल्या विविध औषधींचा योग्यरीत्या वापर करावा आणि कोरोना उपचारांसाठी आवश्यक असलेली औषधे जपून वापरावीत अशा सूचना केल्या. नगरपरिषद प्रशासनाने विशेष लक्ष देऊन निर्जंतुकीकरण वाढविणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी जनजागृती करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. कोरोना नियम व निर्बंधाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, तरीसुद्धा आणखी थोडी सक्ती करावी. गावागावांत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करावी. माहिती व दक्षता यासाठी चौकाचौकांत ग्रामपंचायत प्रशासनाने फ्लेक्स लावावेत. गावात पोलीस पाटलांनी दक्षता घेत गस्त घालावी, अशाही सूचना भांगडिया यांनी यावेळी दिल्या.