कोरपना येथे आमदार जोगु रामण्णा यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST2020-12-16T04:41:53+5:302020-12-16T04:41:53+5:30

कोरपना : तेलंगणा राज्याचे माजी वनमंत्री व आदिलाबादचे विद्यमान आमदार जोगु रामण्णा यांचा कोरपना येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर बावणे ...

MLA Jogu Ramanna felicitated at Korpana | कोरपना येथे आमदार जोगु रामण्णा यांचा सत्कार

कोरपना येथे आमदार जोगु रामण्णा यांचा सत्कार

कोरपना : तेलंगणा राज्याचे माजी वनमंत्री व आदिलाबादचे विद्यमान आमदार जोगु रामण्णा यांचा कोरपना येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर बावणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीप्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदिलाबाद जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष मनोहर राऊत, जिल्हा अध्यक्ष तन्वीर खान, जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, पंचायत समिती सभापती गंभीर ठाकरे, बाजार समिती सभापती एम प्रल्हाद, किशोर बावणे, नानाजी फरताडे, वैभव फरताडे आदी उपस्थित होते. आमदार रामन्ना हे बेला येथे नव्याने निर्मित होणाऱ्या दूध डेअरीच्या अनुषंगाने कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील दुध डेअरीबद्दल तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आले होते. तसेच त्यांनी या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी आदिलाबाद जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: MLA Jogu Ramanna felicitated at Korpana