टोल नाक्यांच्या अंतरात नागरिकांची दिशाभूल
By Admin | Updated: August 9, 2014 23:37 IST2014-08-09T23:37:01+5:302014-08-09T23:37:01+5:30
दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन

टोल नाक्यांच्या अंतरात नागरिकांची दिशाभूल
दोन नाक्यांमधील अंतर हवे ४५ किलोमीटर : बामणी-ताडाळी- नंदोरी टोल नाक्यांतील अंतर केवळ २४ किलोमीटरचे
चंद्रपूर : दोन टोल नाक्यांधील अंतर किमान ४५ किलोमीटर असावे, असा नवा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात उभाररण्यात येत असलेल्या दोन नवनिर्माणाधिन आणि ताडाळीजवळील टोल नाक्यांमधील अंतर फक्त २४ किलोमीटरचे आहे. याचा भुर्दंड चंद्रपूर-बल्लारपुरातील वाहनधारक नागरिकांना बसणार आहे.
नागपूर-चंद्रपूर राज्य मार्गावरील ताडाळी येथे असलेल्या टोल नाक्याकवरून १९९८ पासून वसुली सुरू झाली आहे. प्रत्यक्षात या नाक्यावरील वसुलीची मुदत २०१३ मध्ये संपलेली असतानाही वसुली बाकी असल्याचे कारण दर्शवून ती २०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागपूर-चंद्रपूरच्या प्रवासातील वाहनधारकांना या नाक्यावर टोल भरावा लागत असतानाच आता त्यात नंदोरी आणि बामणी (विसापूर) येथील दोन टोलची भर लवकरच पडणार आहे.
बामणी ते वरोरा-नागपूर या राज्यमार्गाच्या कामाच्या वसुलीसाठी कंत्राट देण्यात आले असून या दोन्ही ठिकाणी वसुलीची तयारी सुरू झाली आहे. नंदोरीलगतचा टोल नाका जवळपास पूर्ण झाला आहे. या आठवडाभरात तिथे चाचणी तत्वावर काम सुरू केले जाणार आहे. १५ आॅगस्टनंतर केव्हाही या टोल नाक्यावरून वसुली सुरू होऊ शकते, अशी माहिती आहे.
त्यानंतर विसापूर नाक्यावरूनही वसुली सुरू करण्याची तयारी झाली आहे. वास्तविक पहाता दोन टोल नाक्यांमधील अंतर ४५ किलोमीटरपेक्षा अधिक असावे, असा नियम असतानाही त्याकडे चक्क डोळझाक करुन वसुलीची तयारी सुरू झाली आहे.
बल्लारपूर ते नागपूर या प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकाला तब्बल पाच ठिकाणी नाका द्यावा लागणार आहे. आताच ३५० रूपयांचा नाका मोजावा लागतो. त्यात दोन नाक्यांची आणखी भर पडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)