अतिक्रमणासंदर्भात ग्रामपंचायतीकडून दिशाभूल

By Admin | Updated: September 17, 2015 00:56 IST2015-09-17T00:56:12+5:302015-09-17T00:56:12+5:30

येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यावर एका इसमाने घरासमोर पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले.

Misconceptions about encroachment by the Gram Panchayat | अतिक्रमणासंदर्भात ग्रामपंचायतीकडून दिशाभूल

अतिक्रमणासंदर्भात ग्रामपंचायतीकडून दिशाभूल

घुग्घुस : येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यावर एका इसमाने घरासमोर पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले. यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा आरोप इबादुल हसन सिद्धीकी यांनी पत्रकार परिषदेत केला.
अतिक्रमण हटविण्याची मागणी लोकशाही दिनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. तक्रारीवरून गटविकास अधिकारी यांनी मौका चौकशी करुन अतिक्रमण असल्याचा अहवाल सादर केला आणि ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना तीन दिवसांच्या आत अतिक्रमण काढून अहवाल सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले. मात्र ग्रामपंंचायतीने कारवाई न करता वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा आरोप इबादुल हसन सिद्धीकी यांनी केला. त्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सिद्दीकी म्हणाले, ग्रामपंचायतीने १९९९-२००० ला विदर्भ विकास वैधानिक महामंडळाच्या निधीतून १२ फुटाच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे निर्माण केले. तेव्हा अतिक्रमण झालेल्या जागेवर रस्त्याला लागून तक्रारकर्त्यांचे घर होते. ते घर सन १९९४ ला बोंडे नावाच्या इसमास विकले. २००३ मध्ये ते घर सध्या अतिक्रमण असलेल्या मोसीम मैनुद्दीन यांनी २००३ मध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी २००५ मध्ये लोखंडी एंगलचे शेड बनवून सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अतिक्रमण केले. तेव्हा केलेल्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविले तर परत त्याच रस्त्यावर २०१२ ला लोखंडी शेड उभे केले. तक्रारीवरुन नायब तहसीलदार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढले आणि तसा अहवाल नायब तहसीलदार यांना पाठविला होता. त्या इसमाने परत आपली मनमानी करुन तिसऱ्यांदा त्या रस्त्याला खोदून अतिक्रमण केले. अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सिद्दीकी यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Misconceptions about encroachment by the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.