काँग्रेसमध्ये लागेबांध्यांमुळे अल्पसंख्यकांना फटका

By Admin | Updated: November 7, 2016 01:32 IST2016-11-07T01:32:37+5:302016-11-07T01:32:37+5:30

काँग्रेसमध्ये हल्ली केवळ आपल्या पालक नेत्यांचे लाड पुरवणारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची फळीच तयार झाल्याने पक्षाचे नुकसान होत आहे.

Minorities hit by Congress in Legislative Assembly | काँग्रेसमध्ये लागेबांध्यांमुळे अल्पसंख्यकांना फटका

काँग्रेसमध्ये लागेबांध्यांमुळे अल्पसंख्यकांना फटका

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : काँग्रेसमध्ये हल्ली केवळ आपल्या पालक नेत्यांचे लाड पुरवणारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची फळीच तयार झाल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका अल्पसंख्यांक समाजाला बसला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकसाठी काम करणाऱ्या नेत्यांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी येथे केले.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाच्या अल्पसंख्यांक मेळावा आणि नागपूर विभाग समिती बैठकीत ते बोलत होते. या मेळाव्यात अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये अन्याय आणि शोषण झाल्याचा पाढा माजी मंत्री सिद्दिकी यांच्यापुढे वाचला. यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ओवेस कादरी, जिया पटेल, मुजीब पठाण, असीम नावेद, मुद्दस्सर पटेल, चंद्रपूर प्रभारी एस.क्यू. जमा, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शाकिर, विभागीय उपाध्यक्ष मो. सुलेमान अली, अनुसूचित जाती सेलचे प्रदेश महासचिव संजय रत्नपारखी यांची उपस्थिती होती.या मेळाव्यात अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे ही देण्यात आले. संचालन अ‍ॅड. मलक शाकिर तर आभार प्रदर्शन मो. सुलेमान यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Minorities hit by Congress in Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.