सिंदेवाही तालुक्यात गौण खनिज चोरी नियंत्रणाबाहेर

By Admin | Updated: April 25, 2016 00:43 IST2016-04-25T00:43:22+5:302016-04-25T00:43:22+5:30

तालुक्यात गौण खनिजाची चोरी आणि दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Minor mineral theft in Sindhevahi taluka out of control | सिंदेवाही तालुक्यात गौण खनिज चोरी नियंत्रणाबाहेर

सिंदेवाही तालुक्यात गौण खनिज चोरी नियंत्रणाबाहेर

सिंदेवाही : तालुक्यात गौण खनिजाची चोरी आणि दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत असल्याचे गत एक वर्षाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
तालुक्यात सध्या एक ते दोन रेती घाटांचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरीत रेती घाटांवरूनही सर्रास रेती, वाहतूक होत आहे. नवीन तहसीलदार रुजू होवून एक महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र अद्याप कारवाई सुरू झालेली नाही.
तालुक्यात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असून मोठ्या इमारती उभ्या झाल्या आहेत. त्यात वापरण्यात आलेल्या गौण खनिजांच्या रॉयल्टीची चौकशी केल्यास लाखो रुपयांचे गौण खनिज चोरीचे असल्याचे आढळेल. परंतु, स्थानिक आणि वरिष्ठ यंत्रणेतील संबंधिताचे वेळोवेळी या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. कोणत्याही पथकांने ठोस कारवाई कधी केलीच नाही. त्यामुळे अवधै वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. त्यातच राजकीय बळाचा वापर करुन अनेक महाभाग गौण खनिज चोरी करीत आहेत. एक वर्षापूर्वी जिल्हात दारूबंदी झाली. मात्र तालुक्यात दारूबंदी आहे हे अजूनही लोकांना विश्वास बसत नाही. सिंदेवाही तालुक्यात भंडारा, नागपूर, जिल्ह्यातून अवैध दारू पुरवठा होत असून पोलीस विभागातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे विक्रेते व पुरवठादारांशी हितसंबंध असल्याची चर्चा आहे. हजारो लिटर दारू पकडली जाते, मात्र अवैध दारूविक्रीवर निर्बंध लावण्यात यश आलेले नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Minor mineral theft in Sindhevahi taluka out of control