क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:27 IST2019-04-29T22:27:24+5:302019-04-29T22:27:37+5:30

राजुरा येथील शिवाजी स्टेडियम येथे सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्याची हत्या करण्यात आल्याचे परिस्थितीवरून पोलिसांनी ओळखले आणि अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक केली.

Minor boy murdered for minor reasons | क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची हत्या

क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची हत्या

ठळक मुद्देदोन तासात आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा येथील शिवाजी स्टेडियम येथे सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्याची हत्या करण्यात आल्याचे परिस्थितीवरून पोलिसांनी ओळखले आणि अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक केली. शेजारच्या मुलीकडे बघतो, या क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.
संदेश रवींद्र ठाकूर (१५) रा. इंदिरा नगर असे मृतकाचे नाव असून तो येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय राजुरा येथे दहावीमध्ये विद्यार्थी शिकत होता. राजुरा येथील शिवाजी स्टेडीयम परिसरात अज्ञात मुलाचा मृतदेह सकाळी फिरायला जाणाऱ्यांना दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, राजुराचे ठाणेदार बाळू गायगोले हे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीवरून सदर मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी कसून चौकशी करीत दोन तासात आरोपी बाल्या उर्फ राकेश वाघमारे (२९) याला अटक केली. आरोपी हादेखील इंदिरा नगर येथे राहतो.
मृतक संदेश हा आरोपीच्या शेजारी असलेल्या व मध्यप्रदेशातून आलेल्या मुलीला बघतो म्हणून आरोपीने संदेशला रात्री स्टेडीयम परिसरात नेले व काठीने मारून त्याची हत्या केली, अशी माहिती राजुराचे ठाणेदार बाळू गायगोले यांनी दिली.

Web Title: Minor boy murdered for minor reasons