वेकोलि माजरी क्षेत्रात खाण सुरक्षा सप्ताह
By Admin | Updated: December 23, 2015 01:18 IST2015-12-23T01:18:45+5:302015-12-23T01:18:45+5:30
वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत तेलवासा, जुना कुनाडा, न्यु. माजरी, अंडर ग्राऊंड ते ओपन कास्ट आणि नवीन कुनाडा

वेकोलि माजरी क्षेत्रात खाण सुरक्षा सप्ताह
माजरी : वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत तेलवासा, जुना कुनाडा, न्यु. माजरी, अंडर ग्राऊंड ते ओपन कास्ट आणि नवीन कुनाडा ओपन कास्ट माईन्स (अ) या सर्व ओपनकास्ट कोळसा खाणीत वार्षिक खाण सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
वार्षिक खाण सुरक्षा सप्ताहदरम्यान सोमवारी नवीन कुनोडा ओपन कास्ट माईन्स (अ) येथे सुरक्षा वार्षिक उत्सव पार पडला. यावेळी खाणीचे निरीक्षण करण्यासाठी बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती उपक्षेत्रीय निरीक्षक पथक प्रमुख उपक्षेत्रीय प्रबंधक वर्गीस यांच्या नेतृत्त्वात पथक आले होते. मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीस माता महाकाली मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुरक्षा मशाल जागविण्यात आली. सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण करुन सर्व उपस्थितांनी सुरक्षा संदर्भात शपथ ग्रहण करण्यात आली. या कार्यक्रमात पी.सी. आॅपरेटर भाऊराव काळे, ई.पी.फिटर हरिदास दानव, मेकॅनिकल फिटर गणपत मांढरे, इलेक्ट्रीशिनय चंदन शुक्ला, पुसला समय्या यांचा ‘सुरक्षित कामगार’ म्हणून उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
खाण सुरक्षा समिती सदस्य, सुरक्षा गीत प्रस्तूतीकरण व लघुनाट्याची चमू, सुरक्षा घोष वाक्य स्पर्धेतील विजेता गजानन मांढरे व उपविजेता राजेश निखाडे यांनाही पुरस्कार वितरण करण्यात आले. यानिमित्त खाण निरीक्षण पथक प्रमुख उपक्षेत्रीय प्रबंधक वर्गीस, पी.व्ही. देशमुख, ए.सी. राव, संजय पिदूरकर, वडसकर, के.माझी, संजय बियाणी, के.रघूवर, नवले या पथकाने नवीन कुनाडा खुली खाण येथील निरीक्षक सुरक्षा संदर्भात लेखी अहवालाची तपासणी केली. या कोळसा खाणीची ३१७ एवढी श्रमशक्ती असून २०१५-२०१६ करीता २ लाख टन कोळसा उत्पादनाचे उद्दीष्ट आहे. (वार्ताहर)