आगीत गोठा जळून लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:31 IST2021-08-27T04:31:12+5:302021-08-27T04:31:12+5:30

आंबोली येथील संजय महादेव लाखडे यांची आंबोली परिसरात शेती आहे. या शेतीत त्यांनी गोठा बांधलेला आहे. या गोठ्यातच ...

Millions of rupees lost due to fire | आगीत गोठा जळून लाखो रुपयांचे नुकसान

आगीत गोठा जळून लाखो रुपयांचे नुकसान

आंबोली येथील संजय महादेव लाखडे यांची आंबोली परिसरात शेती आहे. या शेतीत त्यांनी गोठा बांधलेला आहे. या गोठ्यातच त्यांनी शेती उपयोगी साहित्य व बैल बांधलेले होते. गुरुवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला तर गोठ्यात बांधलेल्या बैलाचा दावा जळाल्याने बैल मुक्त झाला. त्यामुळे तो तिथून बाहेर निघाला; परंतु गोठ्यात असलेले स्प्रिंकलरचे ३० पाइप, डिझेल इंजिन, करंट मशीन, सात हजार रुपयांचे रासायनिक खत, पाच हजार रुपयांचे फवारणी औषध व शेती उपयोगी साहित्य, असे जवळपास दोन लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती शंकरपूर पोलीस चौकी व तलाठी गराटे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे.

Web Title: Millions of rupees lost due to fire