लाखोंचा कोळसा व स्क्रॅबची चोरी

By Admin | Updated: June 16, 2017 00:32 IST2017-06-16T00:32:13+5:302017-06-16T00:32:13+5:30

वेकोलि माजरी क्षेत्राची ‘मदर माईन्स’ म्हणून ओळखली जाणारी माईन नं. ३ भूमिगत कोळसा खाण गेल्या दोन वर्षांपूर्वी बंद झाली.

Millions of coal and scraping theft | लाखोंचा कोळसा व स्क्रॅबची चोरी

लाखोंचा कोळसा व स्क्रॅबची चोरी

सीटू युनियनची तक्रार : चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलि माजरी क्षेत्राची ‘मदर माईन्स’ म्हणून ओळखली जाणारी माईन नं. ३ भूमिगत कोळसा खाण गेल्या दोन वर्षांपूर्वी बंद झाली. त्यानंतर या ठिकाणी नागलोन फेज-२ खुली कोळसा खाण सुरु करण्यात आली. या खाणीत माती काढण्याचे कंत्राट गुजरात येथील रणजीत बिल्डकॉन या कंपनीला देण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीचे मालक कंपनीतील काही लोकांना हाताशी धरून वकोलिचा लाखो रूपयांचा कोळसा व स्क्रॅब साहित्य चोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
चोरीचे प्रकरण उघडकीस येताच या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन सीटू कामगार संघटनेचे महासचिव विरेंद्र ्रप्रसाद गौतम यांनी माजरी पोलीस ठाणे, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी व खाण सुरक्षा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
रणजीत बिल्डकॉन खाजगी कंपनीच्या परिसरात वकोलिचे ३०० ते ४०० टन कोळसा व लाखोंच्या किमतीचे स्क्रॅब साहित्य आढळले आहे. याचा पुरावा म्हणून फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. याची भनक कंपनीला लागताच कंपनीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत कंपनीचे अर्पित पटेल, गोविंद मेहरा, अरविंद दमारे, हार्दिक पटेल यांनी रातोरात सदर कोळसा व सहित्याची विल्हेवाट लावली. चोरी केलेल्या कोळसा व स्क्रॅब सहित्याची विल्हेवाट लावण्याकरिता मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कंपनीच्या डोजर मशीन ५ जी १०५९४, पीसी मशीन १२ सी ४६० बीएलसी, वॉल्वो एबी ३३९६, ३३९७ व ग्रेडर सीजी ०४ डीटी ५६९ या वाहनांचा वापर करण्यात आला आहे, असे सीटू युनियनने तक्रारीत म्हटले आहे.
कंपनी मालक व या प्रकरणात सहभागी असणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करून कंपनीचे कंत्राट ताबडतोब रद्द करण्यात यावे, अशी लेखी तक्रार सीटू संघटनेने केली आहे. यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक अर्पित पटेल यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाबाबत काहीही सांगू शकत नाही. कंपनीच्या मालकाशी संपर्क करा, असे उत्तर दिले.

Web Title: Millions of coal and scraping theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.