शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:10 IST

Chandrapur : बनावट 'लेटरपॅड' व 'रॉयल्टी क्लिअरन्स' आधारे केली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागपुरातील मे. मिडलँड स्टोन कंपनीने चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे बनावट 'लेटरपॅड' व स्वाक्षरी करून 'रॉयल्टी क्लिअरन्स' प्रमाणपत्राच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नागपुरातील मे. मिडलँड स्टोन कंपनी मध्य रेल्वेत गौण खनिज पुरवठ्याचे काम करते. उपमुख्य अभियंता मध्य रेल्वे, वर्धा यांच्याकडे गौण खनिज पुरवठ्याचे काम कंपनीने पूर्ण केले. शासकीय बांधकामात वापरल्या जाणाऱ्या गौण खनिजाच्या स्वामित्वधनाबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेतली जाते.

स्वामित्वधन भरल्यानंतर वाहतूक परवाना जारी होतो. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून कंत्राटदाराची देयके अदा करताना गौण खनिज अधिकृतपणे वापरल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून 'रॉयल्टी क्लिअरन्स' प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्या आधारे शासकीय यंत्रणा कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्वधनाची रक्कम संबंधित कंत्राटदारास उपलब्ध करून देते.

असे उघडकीस आले प्रकरणमिडलँड स्टोन कंपनीने स्वामित्वधनाची जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम मिळावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे अनधिकृत 'लेटरपॅड' तयार करून खोट्या 'रॉयल्टी क्लिअरन्स' प्रमाणपत्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांची बनावट स्वाक्षरी केली. अनधिकृत शिक्का मारून ही कागदपत्रे उपअभियंता, मध्य रेल्वे, वर्धा कार्यालयात सादर केली. उपअभियंता मध्य रेल्वे यांनी पडताळणीसाठी चंद्रपूरचे जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांच्याकडे कागदपत्रे पाठविली. कागदपत्रे बघताच स्वाक्षरी, कार्यालयाचे लेटरपॅड, शिक्का व रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. 

"जिल्हा खनिकर्म विभागाने रामनगर पोलिस ठाण्यात पत्र दिले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती पुन्हा पुरवावी, असे त्यांना कळविले आहे."- सुधाकर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाchandrapur-acचंद्रपूर