ज्युबिली हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST2021-01-20T04:28:33+5:302021-01-20T04:28:33+5:30

या शाळेतून घडलेल्या माजी विद्यार्थ्याच्या सहकार्यातून तसेच माजी शिक्षक वा कार्यरत शिक्षक यांच्या सहकार्यातून सत्र २०२० मध्ये बोर्डाच्या परीक्षेत ...

Meritorious felicitation at Jubilee High School | ज्युबिली हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

ज्युबिली हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

या शाळेतून घडलेल्या माजी विद्यार्थ्याच्या सहकार्यातून तसेच माजी शिक्षक वा कार्यरत शिक्षक यांच्या सहकार्यातून सत्र २०२० मध्ये बोर्डाच्या परीक्षेत आणि प्रत्येक वर्गात प्रथम येणाऱ्या आणि विषयानुसार सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

कार्यक्रमात वैभवी चिडे, दीपमाला रायपुरे, विनित पिदुरकर, प्रणय नवघरे, जागृती चांदेकर, समायरा खान, गौरव शंभरकर, प्रणय पेटकर, रुत्विक उराडे, मेहुलकुमार तोकलवार, देवानंद भेंडारे आणि अन्य विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी जयंत मामीडवार तसेच शाळेचे प्राचार्य रवींद्र काळबांडे, सेवानिवृत्त शिक्षक प्रेमदास रामटेके, माजी विद्यार्थी अजय वैरागडे, सुदीप रोडे, प्रशांत जोशी तसेच शिक्षकगण सुजाता वाघमारे, मोरेश्वर बारसागडे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले आणि भावी यशासाठी मार्गदर्शन केले. आयोजनासाठी मंजुषा मोरे, पुष्पा कोटेवार, हेमावती धनेवार, पूनम मुडेवार, रवींद्र निमकर, शैलेश बरडे, अंबादास सुरपाम, अशोक किन्नाके, शिरीष बोंडे यांनी सहकार्य केले असल्याचे प्राचार्य रवींद्र काळबांडे यांनी कळविले आहे.

Web Title: Meritorious felicitation at Jubilee High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.