शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चंद्रपुरात भडकू लागला पारा; उष्माघात रुग्णांसाठी शीत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे वैद्यकीय अधिकारी अधिनस्त आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. जनजागृतीसाठी हॅन्डबिल, पोस्टर बॅनर व होल्डिंग तयार केले जात आहेत. सिनेमागृह, बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर लावले जाईल. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराच्या तापमानात दररोज धोकादायक वाढ होत आहे. अशा वेळी उष्माघाताने मृत्यू होऊ नये, यासाठी चंद्रपूर मनपाने उष्माघात रुग्णांकरिता शीतकक्ष आणि दिवसभर एक मोबाइल टीम कार्यान्वित  करण्याचा निर्णय उष्माघात कृती आराखडा (हिट ॲक्शन प्लॅन) समन्वय समितीने आज मंगळवारी घेतला. आज चंद्रपूरचे तापमान ४२.३ अंश सेल्सिअस नाेंद झाली आहे.स्थायी समिती सभागृहातील बैठकीत उपायुक्त तथा मुख्य लेखा अधिकारी संतोष कंदेवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, सचिव नगिना नायडू, महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता सू. म. पडोळे, मनपाचे नगररचनाकार मांडवगडे, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आरोग्य पर्यवेक्षक आर. व्ही. खांडरे, मनपाचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, ऑटोरिक्षा असोसिएशनचे हरिदास नागपुरे, चिल्ड वॉटर असोसिएशनचे महेश बुटले आदींसह मनपाच्या सर्व सातही शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उष्माघातामुळे होणारे मृत्यू  प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर मनपाच्या कार्यक्षेत्रात २०१६, २०१७, २०१८ व  २०१९ मध्ये हिट ॲक्शन प्लॅन अर्थात उष्माघात कृती आराखडा राबविला होता. यंदा एप्रिलमध्येच उष्णतेचा पारा दररोज ४० - ४२च्या वर जात असल्याने पुढे काय होणार, याबाबत चिंता उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीने बैठकीत चिंता व्यक्त केली. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराची देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंद झाली.  

वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने प्रशिक्षण  उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे वैद्यकीय अधिकारी अधिनस्त आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. जनजागृतीसाठी हॅन्डबिल, पोस्टर बॅनर व होल्डिंग तयार केले जात आहेत. सिनेमागृह, बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर लावले जाईल. 

सर्व बगीचे व उद्याने दिवसभर सुरू- पाणपोईसाठी स्वयंसेवी संस्थांनी पेंडॉल, मोठे रांजण व मठांची व्यवस्था केल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मनपा करणार आहे. दुपारी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विश्रांतीसाठी सर्व बगीचे व उद्याने दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. बांधकाम मजुरांना दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंतच काम देण्याच्या  करण्यात आल्या.

महाकाली यात्रेसाठी रुग्णवाहिकाचंद्रपुरात यंदा माता महाकाली यात्रा सुरू होणार आहे.  भाविकांचे उष्माघातापासून संरक्षण करणे व  आरोग्य सेवेसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. महाकाली मंदिर ट्रस्टने भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, सावली देणारे पेंडॉल, कुलर लावावे, अशा सूचना मनपाने केल्या आहेत.

कामाच्या वेळेत बदलचंद्रपूर शहरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करावी, असे आवाहन मनपाने केले. बांधकाम मजुरांना दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत उन्हात काम करण्याच्या दृष्टीने वेळेत बदल करण्याच्या सूचनाही दिल्या.

 

टॅग्स :Temperatureतापमान