परिवहनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:08+5:302021-07-23T04:18:08+5:30

सास्ती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटना राजुरा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेचे आयोजन राजुरा येथील श्री संत ...

Meeting of retired employees of transport | परिवहनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा

परिवहनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सभा

सास्ती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटना राजुरा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेचे आयोजन राजुरा येथील श्री संत नगाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते.

यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या चंद्रपूर-गडचिरोली विभागातील आणि राजुरा आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सहविचार सभा राजुरा येथे नुकतीच झाली. या सभेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, शिल्लक रजा रोखीकरण, करारातील थकबाकीचे हप्ते त्वरित देण्याबाबत चर्चा करून मागणी करण्यात आली. याप्रसंगी जून २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पी. एन. मांडवकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर मृत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे राजुरा शाखेचे अरूण जमदाडे, रामचंद्र मुसळे, पी. एम. बांगरे, एस.सी. मडावी, ए. जी. वाघमारे, टि. ए. बनवाडे, एम. आर. इंगळकर, आर. एल. बोरीकर, पी. एन. मांडवकर, बी. के. साहू, डी. एस. आसूटकर, आर. बी. मांडवकर, बी. एस. मोरे, आर. एन. फटींग उपस्थित होते.

220721\img-20210718-wa0009~2.jpg

सत्कार करताना मान्यवर...

Web Title: Meeting of retired employees of transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.