दिवाळीच्या पूर्वसंध्येला कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नतीची भेट
By Admin | Updated: October 30, 2016 00:45 IST2016-10-30T00:45:05+5:302016-10-30T00:45:05+5:30
दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी आपलया कर्माचायांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला पदोन्नतीची भेट दिली आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नतीची भेट
१३९ कर्मचाऱ्यांना बढती : पोलीस अधीक्षकांचा निर्णय
चंद्रपूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी आपलया कर्माचायांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला पदोन्नतीची भेट दिली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या १३९ पोलीस कर्माऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला निघाले आहेत. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकूण तीन हजारांवर कर्मचाऱ्यांपैकी पोलीस हवालदार ते सहाय्यक फौजदार पदावर ३५ जणांना पदोन्नती मिळाली आहे. नाईक पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार या पदावर ५० कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश मिळाले आहेत. तर, पोलीस शिपाई ते नाईक पोलीस शिपाई या पदावर ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे.
पोलीस कल्याणाच्या दृष्टीने यापूर्वीही जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण आणि अपर पोलीस अधिक्षक हेमराजसींग राजपुत यांच्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. सर्वत्र सणवार साजरे होत असले तरी पोलीस कर्मचारी कुटुंबासोबत पूर्ण वेळ सहभागी होऊ शकत नाहीत.
त्यामुळे आपला विभाग हेच आपले कुटुंब ही भावना मनात रूजविण्यासोबतच पोलीस कर्माऱ्यांच्या कुटुंबियांच्या आनंदात सहभागी होण्यााठी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छापत्र आणि मिठाई पाठविण्याचाही उपक्रम यावर्षी दिवाळीत राबविण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)