देशव्यापी संपाच्या पूर्वतयारीसाठी बैठक

By Admin | Updated: August 26, 2015 00:45 IST2015-08-26T00:45:44+5:302015-08-26T00:45:44+5:30

केंद्र शासनाच्या जनविरोधी तथा कामगार विरोधी धोरणाचे विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन २ सप्टेंबरला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

Meeting for preparations for nationwide strike | देशव्यापी संपाच्या पूर्वतयारीसाठी बैठक

देशव्यापी संपाच्या पूर्वतयारीसाठी बैठक

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या जनविरोधी तथा कामगार विरोधी धोरणाचे विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन २ सप्टेंबरला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. हा ऐतिहासिक संप यशस्वी करण्याच्या उद्देशाने स्थानिक भानापेठ परिसरातील आनंद भवनात किशोर पोतनवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक पार पडली.
बैठकीत लाल झेंडा कोलमाइन्स युनियनचे एच.एस. बेग, प्रा.रमेशचंद्र दहिवडे, वामन बुटले, देवराव लोहकरे, इंटकच्यावतीने मैकुशेख शहाबुद्दीन, व्होल्टाज कामगार संघटनेच्यावतीने वंदना जीवने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.रमेशचंद्र दहिवडे यांनी केले. या संपात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा.दहीवडे यांनी केले. किशोर पोतनवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting for preparations for nationwide strike