भारतीय सिमेंट मजदूर संघाची दालमिया प्रशासनासोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:57+5:302021-07-29T04:27:57+5:30

यावेळी कंपनीचे युनिट हेड सुनील भुसारी, मानव संसाधन प्रमुख उमेश कोल्हटकर, व्यावसायिक प्रमुख गिरीश सोमानी, भारतीय सिमेंट मजदूर संघाचे ...

Meeting of Indian Cement Workers Union with Dalmiya Administration | भारतीय सिमेंट मजदूर संघाची दालमिया प्रशासनासोबत बैठक

भारतीय सिमेंट मजदूर संघाची दालमिया प्रशासनासोबत बैठक

यावेळी कंपनीचे युनिट हेड सुनील भुसारी, मानव संसाधन प्रमुख उमेश कोल्हटकर, व्यावसायिक प्रमुख गिरीश सोमानी, भारतीय सिमेंट मजदूर संघाचे नेते ॲड. शैलेश मुंजे, पराग पामपट्टीवार, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, अनिल बंडीवार, किशोर राहुल, रामरूप कश्यप, सुनील टोंगे, प्रवीण शेंडे, राजू गोहणे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कंपनीमध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, जुन्या ३०६ कामगारांपैकी ८५ कामगारांना ओ.अँड एम.मध्ये नोकरी दिली गेली असून ४१ जुन्या स्थायी कामगारांची नियुक्तीपत्रे तयार आहेत व बाकी कामगारांनासुद्धा टप्प्या-टप्प्याने कामावर घेऊ, तसेच उरलेल्या बाकी जुन्या कंत्राटी कामगारांना कंपनीमध्ये प्राधान्याने कामावर घेऊ, अशी माहिती कंपनी प्रशासनाने यावेळी दिली.

Web Title: Meeting of Indian Cement Workers Union with Dalmiya Administration