गुरुदेव सेवा मंडळाची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:17+5:302021-03-23T04:30:17+5:30

सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे गुरुदेव सेवा मंडळ, नागभीड विभागाच्या वतीने द्वितीय केंद्रीय सभेचे आयोजन रविवारी करण्यात ...

Meeting of Gurudev Seva Mandal | गुरुदेव सेवा मंडळाची सभा

गुरुदेव सेवा मंडळाची सभा

सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे गुरुदेव सेवा मंडळ, नागभीड विभागाच्या वतीने द्वितीय केंद्रीय सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले.

या कार्यक्रमात मधुकर टिकले या कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडीचे संचालक सुबोध दादा होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून रेखा बुराडे व इतर ज्येष्ठ कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी सुबोध दादा यांनी विश्वाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या अन्‌ विशेषत: आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. अनेकात एकत्व शोधताना खेड्यांमध्ये या संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे सांगितले. कार्यक्रमाला तळोधी, आवळगाव, आकापूर, उश्राळ मेन्ढा, कोजबी, गिरगाव या सर्व गावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

Web Title: Meeting of Gurudev Seva Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.