गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्याची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:31+5:302021-03-09T04:31:31+5:30
देवाडा: चंद्रपूर जिल्हा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सिद्धेश्वर-देवाडा येथील सांस्कृतिक समाज भवनात पार पडली. या बैठकीत गोंगपाचे ...

गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्याची बैठक
देवाडा: चंद्रपूर जिल्हा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सिद्धेश्वर-देवाडा येथील सांस्कृतिक समाज भवनात पार पडली. या बैठकीत गोंगपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पं.स.माजी सदस्य अब्दूल जमीर अ.हमीद यांची गोंडवाना गणतंत्र पार्टी अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष हरीशदादा उईके, वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
गोंडवाना गणतंत्र पार्टी ही गोंडवाना भूभागात राहणाऱ्या ८५ टक्के मूळनिवासी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय चळवळ आहे. येथे सर्व समाजाच्या प्रतिनिधींना सामावून घेऊन वंचित व गोरगरीब जनतेच्या न्याय्य-हक्कासाठी लढा देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके यांनी सांगितले.
बैठकीला गोंगपा प्रदेश कोषाध्यक्ष महेश बमनोटे, किसान पंचायत समिती प्रदेशाध्यक्ष दमडुजी मडावी, प्रदेश संघटक विठ्ठल उईके, नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज मडावी, वर्धा जिल्हा युवा अध्यक्ष सचिन मसराम, गजानन गोदरू पाटील जुमनाके, जिल्हा बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी, बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे, ममता जाधव उपस्थित होते.