गडचांदुरात गोंडवाना गणतंत्र पार्टीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:10+5:302021-01-13T05:13:10+5:30
: गडचांदूर येथील विश्राम भवनात गोंडवाना गणतंत्र पार्टीची सभा नुकतीच झाली. यावेळी स्वर्गीय गोदरू पाटील जुमनाके यांना ...

गडचांदुरात गोंडवाना गणतंत्र पार्टीची सभा
: गडचांदूर येथील विश्राम भवनात गोंडवाना गणतंत्र पार्टीची सभा नुकतीच झाली.
यावेळी स्वर्गीय गोदरू पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गोदरू पाटील जुमनाके यांच्या अकाली मृत्यूने गोंडवाना गणतंत्र पार्टीला व कार्यकर्त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेतून कार्यकर्त्यांनी स्वत:ला सावरून स्व. गोदरू पाटील जुमनाके यांच्या स्वप्नपूर्तीसाठी येत्या ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हमीद यांनी केले. या सभेला कोर कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी, गजानन पाटील जुमनाके, मेहबूब शेख, निशिकांत सोनकांबळे, ममता जाधव, प्रा. लक्ष्मण मंगाम, फारुख शेख, भीमराव पाटील जुमनाके, मुनिरभाई सय्यद, बंडु कुमरे, जितू मडावी, भारत आत्राम, वाघू उईके, संजू सोयाम, लक्ष्मण कुडसंगे, पिसाजी कुलमेथेे, अरूण उदे, दीपक पेंदोर, संजू आत्राम, वसंत आत्राम, गुलाब मेश्राम, झहीर भाई, प्रभू चिनूरवार, प्रकाश शेडमाके उपस्थित होते.