गोंडपिपरीत महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:04+5:302021-02-05T07:37:04+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार संजय धोटे, महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे, जि.प. अध्यक्ष ...

गोंडपिपरीत महिला मेळावा
प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार संजय धोटे, महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे, जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, वनिता कानडे, पं. स. सभापती सुनीता मेग्गेवार उपस्थित होते. सदर महिला मेळाव्यात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या, साफसफाई कर्मचारी म्हणून कार्य करणाऱ्या, फूटपाथवर छोटी दुकाने टाकून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या, कोरोना उपसर्ग काळात सेवा देणाऱ्या, पोलीस विभागात सेवा देणाऱ्या अशा आत्मनिर्भर महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक अरुणा जांभुळकर यांनी केले. संचालन दमयंती वाकडे, मनीषा मडावी आणि दिवसे यांनी केले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अंजनी खांडरे, अश्विनी तोडासे, गौरी वेगीनवार, प्रियंका रासमलवार, अल्का फलके, किरण नगारे, सरिता पुणेकर, धीरा गौर, सुषमा तोडासे, कविता नागपुरे यांनी परिश्रम घेतले.