चिमूरात समाज क्रांती आघाडीचा कार्यकर्ता मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:56+5:302021-01-13T05:13:56+5:30
येथील जुनी राष्ट्रीय शाळा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा सरकारने २०१४ पासून संविधानाला कमजोर करण्याचे ...

चिमूरात समाज क्रांती आघाडीचा कार्यकर्ता मेळावा
येथील जुनी राष्ट्रीय शाळा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा सरकारने २०१४ पासून संविधानाला कमजोर करण्याचे प्रयत्न झपाट्याने सुरू केले आहे. संविधानातील धर्मनिरपेक्षता, सार्वभौमता, समाजवाद, गणतंत्र आणि लोकशाही या मुलभूत तत्त्वांचे उल्लंघन करीत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी समाज क्रांती आघाडीच्या महिला संघटिका छायाताई खैरे, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाबराव खोब्रागडे, सिद्धार्थ चहांदे, भालचंद्र गायकवाड, प्रकाश चुनारकर, पांडुरंग रामटेके आदींनी विचार मांडले. संचालन आघाडीचे तालुका सचिव संभा गजभिये व आभार शहर अध्यक्ष जयंत मेश्राम यांनी मानले. मेळाव्याला प्रमोद गौरकार, आनंदराव रंगारी, गुलाब रामटेके, प्रभुदास मेश्राम, अंकुश पाटील, देविदास रंगारी, प्रशांत चहांदे, राजू गौरकार, जनार्धन मेश्राम, जयराम बांबोडे, नामदेव शेंडे, वसंत ठवरे, सूरज ठवरे, देवराव मेश्राम, विनोद येसांबरे आदींची उपस्थिती होती.