वैद्यकीय प्रतिनिधींचा देशव्यापी संप

By Admin | Updated: December 22, 2015 01:11 IST2015-12-22T01:11:22+5:302015-12-22T01:11:22+5:30

अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने (एफएमआरएआय) विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता एक

Medical representatives nationwide | वैद्यकीय प्रतिनिधींचा देशव्यापी संप

वैद्यकीय प्रतिनिधींचा देशव्यापी संप

चंद्रपूर : अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने (एफएमआरएआय) विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता एक दिवसीय संप केले.
औषधाच्या किमती कमी करावे, सार्वजनिक क्षेत्रातील औषध कंपन्या, लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे पुनरुज्जीवन करावे व बहुराष्ट्रीय कंपन्याची कागळीकरता थांबवा, औषधांची आॅनलाईन, अयोग्य व अनैतिक विक्री थांबवावी, महिला विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांना सहा महिन्याची बाळंतपणाची रजा द्यावी, वैद्यकीय प्रतिनिधींना किमान वेतन रुपये २० हजार रुपये घोषित करावे, वैद्यकीय प्रतिनिधींचे कामाचे स्वरुप कायद्याद्वारे निश्चित करावे व सलग आठ तासाचे काम द्यावे आदी मागण्याचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
मोर्चात संघटनेचे १२० सदस्य सहभागी झाले होते. यावेळी शाखा सचिव मनीष पळसोकर, विभागीय सचिव प्रमोद जुपाकवार, कोषाध्यक्ष राजेश गन्नारपवार, सहसचिव बंडू सोरडे, कार्यकारी सदस्य विनय कुलकर्णी, प्राजंल देशकर, पुरुषोत्तम नंदेश्वर, अतुल तेलंग, ईश्वर रोडे, दीपक साहू, निखिल ठाकरे, गोपाल गांधी, सुजाता बोदीले यांचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Medical representatives nationwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.