आदेशाच्या २१ दिवसांनंतरही वैद्यकीय अधिकारी रुजू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:23+5:302021-07-20T04:20:23+5:30
जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर ...

आदेशाच्या २१ दिवसांनंतरही वैद्यकीय अधिकारी रुजू नाही
जिवती : आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू झाले. मात्र, यंत्रणा नसल्याने या उपकेंद्रात शेळ्या-मेंढ्या बांधल्या जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी १५ दिवसांच्या आत उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अवघ्या २४ तासांतच रुग्णालय सुरू करण्याचे आदेश व वैद्यकीय अधिकारी म्हणून श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली. मात्र, २१ दिवस उलटूनही त्या रुग्णालयात हजर झाल्या नाहीत.
दोन दिवसांत टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर हजर न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, अशा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.
परिसरातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी, या हेतूने पाच ते सहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र, कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ ला आदेश पत्र काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांची नियुक्ती केली होती. मात्र, या डॉक्टर येण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे इमारत बांधून तशीच ओसाड पडून आहे. यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
२१ दिवसांचा कालावधी लोटूनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे आता निवेदन नाही तर सरळ हल्लाबोल, असे म्हणत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालृू, असा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी दिला आहे.
बॉक्स
आरोग्यसेवेसाठी आर्थिक भुर्दंड
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी नियुक्ती आदेश काढून डॉ. श्रद्धा माडूरवार यांच्याकडे या रुग्णालयाची सूत्रे सोपविण्यात आली होती; पण २१ दिवस उलटूनही त्या येथे रुजू झाल्या नाहीत. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांची कोरोनाकाळात गैरसोय होत आहे. आजार झाल्यास अकारण खासगी रुग्णालय किंवा जिवती येथील रुग्णालयात जावे लागते. यात गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
190721\img-20210719-wa0111.jpg
सिंधुताई जाधव