लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रपुरातील माता महाकालीच्या ऐतिहासिक यात्रा महोत्सवाला बुधवारी (दि. ३) पासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा महिनाभर भरणार असून, महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातून भाविकांचे जत्थे दर्शनासाठी दाखल होऊ लागले. मराठवाड्यातील भाविकांचे आठवडाभरापासून आगमन सुरू झाले. १२ मे २०२५ पर्यंत भरणाऱ्या यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगर पालिका व महाकाली मंदिर ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे.
चैत्र नवरात्र उत्सवापासून म्हणजे बुधवारपासून ही यात्रा महिनाभर राहील. हनुमान जयंती १२ एप्रिल हा सर्वात गर्दीचा दिवस असतो. गर्दी वाढणार असल्याने शांतता व सुव्यवस्थेसाठी ३ एप्रिल ते १२ मे २०२५ पर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. चंद्रपूर मनपाने मंदिरासमोरून बैल बाजार परिसरात जाणारा रस्ता हा अरुंद असल्याने स्वस्तिक ग्लास फॅक्टरीजवळून हाकाली नगरीपर्यंत मार्ग तयार केला. बैलबाजार पटांगणात चार मोठे मंडप उभारले. पिण्यासाठी १२ ठिकाणी २ हजार लिटरची क्षमता असलेल्या २० टाक्या उभारल्या. वाहन तळ निश्चित केले. यात्रा मैदानात ३३ पक्के व फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली.
दर्शन रांगेचे व्यवस्थापनमुख्य प्रवेशद्वारापासून धर्मशाळेपर्यंत स्थायी दर्शन रांगेची व्यवस्था आहे. हनुमान मंदिर व गणेश मंदिरजवळ लोखंडी पूल तयार केला. अतिरिक्त रांगेचीही व्यवस्था आहे. शेडजवळ लोखंडी बॅरीकेड्स व मंडप उभारले. ६ हजार स्क्वेअर फूट मजबूत टिन शेडमध्ये रेलिंग टाकले. परिसर थंड ठेवण्यासाठी फॉगर सिस्टीम लावले. चार एलईडी टीव्ही लावले. दिव्यांग व ज्येष्ठ भाविकांसाठी विशेष दर्शन सुविधा आहे. आपत्ती ओढवल्यास मनपा शाळा व इतर अशा १८ जागा राखीव ठेवल्या आहेत. यात्रेकरू महिलांसाठी हिरकणी कक्ष, मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक व प्रशासनाच्या सुविधांची माहिती पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.
पोलिस व स्वयंसेवक तैनातपोलिस चौकीत सज्ज आहे. मंदिर ट्रस्टने ३० ध्वनिक्षेपक लावले. मनपाकडून २४ तास आरोग्य केंद्र सुरू राहील. महाप्रसाद वितरणासाठी स्वतंत्र शेड तयार केले. खासगी सुरक्षा रक्षक तैनात आहेत. देवस्थानचे नियमित सुरक्षारक्षक व याव्यतिरिक्त १०० महिला व पुरुष स्वयंसेवकांची नियुक्त झाली आहे.
असे आहे वाहनतळमूलकडून येण्याऱ्या यात्रेकरूंसाठी सिद्धार्थ स्पोटिंग क्लब ग्राउंड, बल्लारपूरकडून येण्याऱ्यांसाठी डी.एड. कॉलेज ग्राउंड, चंद्रपूरकरांसाठी कोहिनूर स्टेडियम दादमहाल वॉर्ड व यात्रा मैदान, रेल्वे लाइनजवळ तसेच नागपूरकडून येण्याऱ्यांसाठी न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड चांदा क्लब ग्राउंडसमोर, वरोरा नाका.
भाविकांची निवास व्यवस्थाभक्त निवासासाठी धर्मशाळेसमोरील भागात व मंदिराच्या मागे शेड तयार झाले. भैरवनाथ मंदिर समोरील भागात ताडपत्री मंडप आहे. महाकाली स्टेडियमवर भक्तांसाठी १८ हजार स्क्वेअर फूट कापडी मंडप उभारला. पाच हजार फुटाचे टीन शेड तयार केले. देवस्थांनाकडून भव्य मंडप तयार आहे. भाविकांना कोणत्याही अडचणी येणार नाही, अशी माहिती महाकाली देवस्थानचे व्यवस्थापक सुनील महाकाले यांनी दिली. कपडे बदलण्यासाठी मनपाने प्रथमच ४० खोल्यांची व्यवस्था झरपट नदी, अंचलेश्वर गेटजवळ केली आहे.