गोंडपिपरीत अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे

By Admin | Updated: April 1, 2016 01:32 IST2016-04-01T01:32:35+5:302016-04-01T01:32:35+5:30

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर गोंडपिपरी शहरात दारू व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे. विना मेहनतीने भरमसाठ कमविण्याच्या लालसेने शेकडोच्यावर दारू व्यावसायिक निर्माण झाले आहेत.

Mast band of illegal liquor vendors | गोंडपिपरीत अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे

गोंडपिपरीत अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे

शेकडो विक्रेते : दारू विक्रेत्यांवर पोलिसांची मेहरनजर
गोंडपिपरी: चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर गोंडपिपरी शहरात दारू व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे. विना मेहनतीने भरमसाठ कमविण्याच्या लालसेने शेकडोच्यावर दारू व्यावसायिक निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या सहकार्याने हे दारू विक्रेते बनावट दारू विकून नागरिकांच्या जिवावर उठले आहेत.
गोंडपिपरी शहरातील अनेक तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. एकशे दहा रुपयाला मिळणारी विदेशी दारू पैशाच्या लालसेने दारूविक्रेते दोनशे पन्नास ते तिनशे रुपयाला विकून तळीरामांची लुट सुरु केली आहे.
या दारूविक्रीच्या जाळ्यात गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत अडकले आहेत. काही दारू व्यावसायिक फोनवर घरपोच दारू पोहचवत आहेत तर काही दारु व्यावसायिक पानटपऱ्यांचा देखावा दाखवून पानटपऱ्यातून व्यवसाय सुरु केला आहे. शहरात मोहफूलाच्या दारुपासून तर आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्याचे लेबल असलेल्या विदेशी दारु विकत आहेत.
नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून जवळ असताना महाराष्ट्राची दारू गोंडपिपरी शहरात दिसत नाही. मात्र पाचशे ते सहाशे किमी अंतरावर असलेल्या बाहेर राज्याची दारू गोंडपिपरी शहरात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. त्यामुळे सदर विदेशी दारू बनावट की ओरीजनल असे तर्कवितर्क सुरु आहे. सदर दारू प्याल्याने अनेकांना पोटाच्या बिमाऱ्या वाढल्या आहेत. तर अनेक तळीरामांना रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला आहे. शहरातील चौकाचौकात राजरोसपणे दारू विक्री सुरु असताना गोंडपिपरी पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होऊ लागला आहे. रोजची लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल बघता दारू व्यावसायिकांना बड्या पदाधिकाऱ्याचा आशिर्वाद असल्याचे दिसून येते. त्यामुळेच पोलीस मूग गिळून असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलीस दारू विक्रेत्यांवर चार ते सहा महिन्यांनी एखादी केस करुन आपली कॉलर टाईट करुन घेत असल्याचेही अनेकजण बोलत आहेत. मात्र हेच केस दाखल झालेले दारूविक्रेते भविष्यात मोठे डिलर बनणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्यातरी दारूविक्रेत्यांवर पोलिसांची मेहरनजर असल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Mast band of illegal liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.