वरोरा : लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वरोरा शहरात लोकमतच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात महिला व युवतींची संख्याही लक्षवेधी होती.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साई वर्धा पॉवर कंपनीचे अधिकारी ज्ञानेश्वर माटे, उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीचे प्रमुख संजय गावित, उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव गोंगले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गोपाळ गुडदे तर उपस्थितांचे आभार प्रवीण खिरटकर यांनी मानले.
बॉक्स
४० व्या वेळी रक्तदान करणाऱ्याचा सत्कार
वेकोलिमध्ये कार्यरत असलेले वरोरा शहरातील रहिवासी राजेश निखाडे यांनी लोकमत परिवाराच्या रक्तदान शिबिरात ४० वे रक्तदान केले. त्यामुळे त्यांचा लोकमत परिवाराच्या वतीने बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे व वरोरा तालुका पत्रकार संघाचे सचिव श्याम ठेंगडी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बॉक्स
निवृत्त सैनिकांनी केले रक्तदान
लोकमतचे रक्तदान शिबिर सुरू असल्याची माहिती मिळताच माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होताच ते शिबिरात आले. संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, सचिव दीपक मरस्कोल्हे, सहसचिव वामन राजूरकर, तालुका प्रभारी परिक्षित नकले या निवृत्त सैनिकांनी रक्तदान केले. यासोबतच बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे यांनी रक्तदान केले.
180721\img-20210718-wa0137.jpg
images