औषधांच्या दुकानात मास्क विक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:52+5:302021-03-07T04:24:52+5:30

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे पुन्हा तोंडवर काढले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणे ...

Mask sales at drugstores increased | औषधांच्या दुकानात मास्क विक्री वाढली

औषधांच्या दुकानात मास्क विक्री वाढली

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे पुन्हा तोंडवर काढले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना मास्क वापरणे सुरू केले असून, औषधांच्या दुकानातील मास्क विक्री मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढली आहे.

मागील काही दिवसांमध्ये महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाने मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच प्रशासकीय कारवाईतून सुटका करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर वाढविला आहे. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासन आता प्रत्येक दुकान, कार्यालयात तसेच चौकाचौकांमध्येही कारवाई करीत दंड वसूल करीत आहेत. सद्य:स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात ५०४ ॲक्टिव रुग्ण असून, आजपर्यंत ४०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बाक्स

असे आहे मास्कचे दर

१० ते २० रुपये

कापडी मास्क

२० ते २५ रुपये

एन ९५ मास्क

२ ते ३ रुपये

डिस्पोजल मास्क

--

मागील १५ ते २० दिवसांपासून कोरोना संकट वाढले आहे. त्यामुळे प्रशासन मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करीत असल्यामुळे मास्कच्या मागणीत वाढ झाली आहे.

औषध विकेता, चंद्रपूर

Web Title: Mask sales at drugstores increased