न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय
चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव रामदास वाग्दरकर, प्राचार्य हरिहर भांडवलकर,पर्यवेक्षक संजय वऱ्हेकर आणि ज्येष्ठ शिक्षिका बैद यांची उपस्थिती होती.
तसेच प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक येथील राष्ट्रमाता स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला,राजीव गांधी क्रीडा संकुल चंद्रपूर व गांधी चौक चंद्रपूर येथील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य हरिहर भांडवलकर, वऱ्हेकर बैद यांची उपस्थिती होती. यावेळी. अंड्रस्कर यांनी गीत सादर केले.
संचालन वैरागडे आभार अंड्रस्कर यांनी मानले.
-
भवानजीभाई चव्हाण हायस्कूल
चंद्रपूर : भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक सी. डी. तन्नीरवार, उपमुख्याध्यापक सी.बी. टोंगे, पर्यवेक्षक के.एन. विधाते तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
--