चंद्रपूर महानगरपालिकेत शहीद दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:58+5:302021-03-24T04:25:58+5:30
चंद्रपूर : महानगरपालिकेतर्फे २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भारतमातेचे वीर सुपुत्र भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली. ...

चंद्रपूर महानगरपालिकेत शहीद दिन
चंद्रपूर : महानगरपालिकेतर्फे २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भारतमातेचे वीर सुपुत्र भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली. आयुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आयुक्त म्हणाले, भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव म्हटल्यानंतर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्रयीचा एक चेहरा येतो. त्यांना आजच्याच दिवशी १९३१ साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ देशभरात २३ मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपायुक्त विशाल वाघ, अशोक गराडे, कवडू नेहारे, सुरेश माळवे, आशिष जीवतोडे, गुरुदास नवले, अमूल भुते आदी उपस्थित होते.