विवाह एकीशी व पलायन दुसरीसोबत
By Admin | Updated: May 9, 2015 01:09 IST2015-05-09T01:09:14+5:302015-05-09T01:09:14+5:30
तालुक्यातील जुगनाळा येथील नितीन शालिकराम ठाकरे (२५) युवकाने एका महिन्यापूर्वी रितीपरंपरेनुसार लग्न केले.

विवाह एकीशी व पलायन दुसरीसोबत
ब्रह्मपुरी : तालुक्यातील जुगनाळा येथील नितीन शालिकराम ठाकरे (२५) युवकाने एका महिन्यापूर्वी रितीपरंपरेनुसार लग्न केले. परंतु, त्याने विवाहित पत्नीला सोडून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. त्यानुसार नितीन ठाकरे रा. जुगनाळा याला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलीशी लग्नाअगोदर प्रेमसंबंध होते. परंतु घरच्याच्या आग्रहाखातर मुलाने रितीरिवाजानुसार एक महिन्यापूर्वी लग्न केला. तर दुसरी अल्पवयीन मुलगी माहेर (खरबी) येथे लग्नाला गेली असता, आरोपी नितीन तेथे गेला व तिला फूस लावून पळवून नेले. सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली असता, आरोपी हा पुण्याला असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.
ब्रह्मपुरी पोलीस पुणे येथे जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले व आरोपी नितीनला अटक केली. अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी नितीनचे एक महिन्यापूर्वी विवाह एकीशी व एक महिन्यानंतर पलायन दुसरीशी केल्याने गावात चर्चेचा विषय बनलेला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक राऊत करीत आहेत. (प्रतिनिधी)