विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: May 20, 2016 01:01 IST2016-05-20T01:01:52+5:302016-05-20T01:01:52+5:30
काही दिवसापूर्वी प्रसूत होऊन एका मुलास जन्म देणाऱ्या एका विवाहितेने माहेरी घराशेजारील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

विवाहितेची आत्महत्या
ब्रह्मपुरी: काही दिवसापूर्वी प्रसूत होऊन एका मुलास जन्म देणाऱ्या एका विवाहितेने माहेरी घराशेजारील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना ब्रह्मपुरी येऊन जवळच असलेल्या रानबोथली येथे बुधवारी घडली. विशेष म्हणजे मृत महिलेच्या मुलाचे बारसे दोन दिवसांनी करण्यात येणार होते.
१८ मेच्या मध्यरात्री नंतर घडलेल्या या घटनेनंतर सदर विवाहितेला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दीपाली टिकेश्वर राऊत असे तिचे नाव आहे. २० एप्रिल २०१५ रोजी रानबोथली येथील संभाजी तानूजी खरकाटे यांची मुलगी दिपाली लग्न होऊन कुडेसावली (ता. लाखांदूर) या आपल्या सासरी गेली. उच्चशिक्षित दीपालीचे पती मुंबई येथे नोकरी करतात. दिपाली गरोदर असल्याने मार्च महिन्यात ती रानबोथली येथे आपल्या वडिलांकडे आली होती. काही दिवसांपूर्वी प्रसूती होऊन तिने एका गोडस बाळास जन्म दिला होता. (तालुका प्रतिनिधी)