उद्यापासून बाजारपेठची वेळ बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:47+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात एकच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. विशेष म्हणजे, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६० जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले. यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंसह अन्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती. या वेळेमुळे चंद्रपूरात नागरिकांची एकच झुंबड उडायला लागली. रस्ते लॉकडाऊनपूर्वीप्रमाणे गर्दीने व्यापू लागले.

उद्यापासून बाजारपेठची वेळ बदलणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येत्या गुरुवारपासून बाजारपेठेच्या वेळत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता अशी करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. याबाबतचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी काढतील, अशी माहिती पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात एकच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. विशेष म्हणजे, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६० जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले. यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंसह अन्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती. या वेळेमुळे चंद्रपूरात नागरिकांची एकच झुंबड उडायला लागली. रस्ते लॉकडाऊनपूर्वीप्रमाणे गर्दीने व्यापू लागले. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळली जात नसल्याची बाब पुढे आली. यावर पर्याय म्हणून बाजारपेठेची वेळ बदलली जाणार आहे.
कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी ३८ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीचे नियोजन केले होते. आतापर्यंत जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीतून २४ कोटी २९ लाखांचा निधी उपलब्ध दिलेला आहे. महानगर पालिकेलाही जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३३ लाख रुपये दिलेले आहे. नगर परिषद व पंचायतींना ७ कोटी ५० लाख रुपये उपलब्ध करून दिल आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याचेही ना. वडेट्टीवार म्हणाले.
३०० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात
शहरी, ग्रामीण व मनपा क्षेत्रांमध्ये एकूण १६ हजार १९३ व्यक्ती गृह अलगीकरणात आहे. आतापर्यंत ३९ हजार ५४३ व्यक्तींचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. संस्थात्मक अलगीकरणात चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात ११०, तालुकास्तरावर १९० असे एकूण ३०० नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.