न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST2021-03-01T04:31:31+5:302021-03-01T04:31:31+5:30

चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित येथील न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा दिनाचा ...

Marathi Language Day at New English High School | न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन

न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन

चंद्रपूर : दि एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित येथील न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिहर भांडवलकर, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षिका संगीता बैद, मराठी विभाग प्रमुख ज्योत्स्ना नरड उपस्थित होत्या. याप्रसंगी नरड यांनी प्रास्ताविकातून मराठी राजभाषेचे महत्त्व विशद केले. प्राध्यापिका श्रावने, पर्यवेक्षिका बैद व प्राचार्य भांडवलकर यांनीही मराठी भाषेवर मार्गदर्शन केले. वक्तृत्व व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संचालन अंजली लहामगे यांनी केले. आभार कल्पना वैरागडे यांनी मानले.

.

Web Title: Marathi Language Day at New English High School