मराठा लॉन्सर संघ ठरला ‘खासदार चषक’चा मानकरी
By Admin | Updated: December 2, 2015 00:55 IST2015-12-02T00:55:03+5:302015-12-02T00:55:03+5:30
महाराष्ट्र हे खेळांचे माहेरघर असून कुस्ती व कबड्डी या खेळात राज्याचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे.

मराठा लॉन्सर संघ ठरला ‘खासदार चषक’चा मानकरी
विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप : देशी खेळ हा प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय : हंसराज अहीर
चंद्रपूर : महाराष्ट्र हे खेळांचे माहेरघर असून कुस्ती व कबड्डी या खेळात राज्याचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. या दोन्ही क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. नावलौकीक संपादन केला आहे. देशी खेळ हा प्रत्येकांच्या आकर्षणाचा विषय राहिला असून कबड्डीबाबत लोकांमध्ये विशेष आवड दिसते. चंद्रपुरातील मैदानावर आजवर अनेक सामने आयोजित केले व ते सातत्याने आयोजित केले जात आहेत. कालिदास अहीर स्मृतिप्रीत्यर्थ ‘खासदार चषक’ विदर्भस्तरीय पुरुषांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान व सत्कार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ते विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
रविवारी स्थानिक डॉ. रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव अंदनकर, महापौर राखी कंचर्लावार, भाजप नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, वासुदेव कोतपल्लीवार, दिलीप कपूर, हरिश्चंद्र अहीर, उपमहापौर वसंत देशमुख, अनिल फुलझेले, शंकर वाकोडे, मन्ना महाराज त्रिवेदी, दिलीप रामेडवार, डॉ.एम.जे. खान, राहुल सराफ, सुभाष कासनगोट्टूवार, मधुसूंदन रुंगठा, बंडू लडके, वेकोलिचे क्षेत्रिय महाप्रबंधक मिश्रा, अशोक मोरे, धनंजय हुड, अंजली घोटेकर, मोहन चौधरी, रघुविर अहीर, शामल अहीर, विनय अहीर, महेश अहीर, चंदन अहीर, राजू घरोटे, रवि गुरनुले, सुषमा नागोसे, माया उईके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
स्पर्धेत मराठा लान्सर नागपूरचा संघ ‘खासदार चषक’चा मानकरी ठरला. तर उपविजेता संघ म्हणून जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ यांना पुरस्काराने ना. अहीर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तृतीय पुरस्कार समर्थ क्रीडा मंडळ अमरावती व जयभारत क्रीडा मंडळ बल्लारपूर यांना चषक देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी कबड्डी खेळातील चंद्रपूरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल माळवे व राष्ट्रीय खेळाडू सुनील वानखेडे, लक्ष्मण पवार, कैलास राठोड, वसंता देवटकले, रामू पवार, सरिता नैनवार यांचा ना. अहीर व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता सन्मित्र मंडळाचे व सत्शिल बहुउद्देशिय मंडळाचे पदाधिकारी धनंजय हुड, अनंता ठाकरे, विनोद शेरकी, अमित लडके, रविंद्र शेरकी, प्रमोद डाखोरे, संभा खेवले, मोहन चौधरी, किशोर कुडे, सचिन ठाकरे, मनोज शेरकी, महेंद्र व्याहाडकर, भरत रोहणे, दीपक लडके, प्रमोद डंबारे, बापु शेरकी, तेजस काळे, समीर चापले, श्याम चापले, संतोष दंडेवार, चेतन शिवणकर, राजकुमार चौधरी, राहुल गायकवाड, सुहास बनकर, निलेश माळवे, आशीष चहारे आदींनी सहकार्य केले. संचालन मोंटू सिंह व अंजली घोटेकर यांनी केले आभार विनोद काळे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)