अनेकांनी सुरू केली मास्क विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:22+5:302021-02-20T05:21:22+5:30
मागील काही दिवसांपासून प्रशासनाने व्यवहार करण्यावर सूट दिल्यानंतर बाजारपेठ खुली झाली आहे. यामध्ये काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मास्क विक्रीचा नवा ...

अनेकांनी सुरू केली मास्क विक्री
मागील काही दिवसांपासून प्रशासनाने व्यवहार करण्यावर सूट दिल्यानंतर बाजारपेठ खुली झाली आहे. यामध्ये काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मास्क विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे.
मोकाट जनावरांची समस्या सुटता सुटेना
चिमूर : चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठाण मांडल्याचे चित्र रोज दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असून या मोकाट जनावराच्या ‘सैराट’पणामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित
गोंडपिपीर : गोंडपिंपरी तालुक्यातील काही गावांत जंगल परिसरातील शेतकऱ्यांना रानटी डुकरांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वन्यप्राण्यांचा शेतशिवारात हैदोस असून शेतपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पाणंद रस्त्याची प्रतीक्षा
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत तयार करण्यात आलेले पाणंद रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्णवस्थेत आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना या मार्गावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे.