भिसीच्या शिबिरात अनेकांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:45+5:302021-07-20T04:20:45+5:30
भिसी : लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे व आ.बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकमत ...

भिसीच्या शिबिरात अनेकांनी केले रक्तदान
भिसी : लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे व आ.बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकमत वृत्तपत्र समूह, श्री छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय मंडळ भिसी, आमदार बंटी भांगडिया मित्रपरिवार व डाॅ.हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भिसी येथील विठ्ठल-रखुमाई सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला आ.भांगडिया यांनी भेट दिली.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
शेषराज रामटेके, अमोल पवार, इरफान पठाण, श्रीकांत गभणे, प्रदीप कामडी, देवेंद्र मुंगले, मनोज अहेर, संदीप कामडी, निखिल काळे, मोहन गाडीवार, स्वप्निल गंधरे, रोशन डुकरे, राहुल इंगोले, तुषार रंदये, जयंत नेवारे, योगेश वाघ, नितीन वाघ, अनिकेत झिले, जगदिश खामनकर, दिलीप खोब्रागडे, अमोल वाघ, संजय सहारे, सारंगधर देशपांडे, विनोद दिघोरे, दिनेश दिघोरे, राकेश नंदनवार, नीलकंठ सोनवाने, पंकज गाडीवार, धनंजय सहारे, अभिजीत तेजने, यशवंत भुजाडे, अभिलाषा भुजाडे, उषा नंदनवार, सुनील मेश्राम, आदित्य सोनवाने.