मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST2021-09-02T05:00:00+5:302021-09-02T05:00:47+5:30

जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी देत होती. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला. बºयाच केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आपल्या पावली परत जात होते.

Many did not take the second dose of the vaccine even after the deadline! | मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ लाखांहून जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, यातील अनेकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोग्य विभागाने दोनही डोसचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देणे सुरू केले आहे.
जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी देत होती. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला. बºयाच केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आपल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांचीही संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच लसीकरण केंद्रांवर जागृतीचे बॅनर लावणे, घरोघरी भेटी देऊन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक
दोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोस शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे, आरोग्य विभागाचा सल्ला स्वीकारावा.

नेमकी अडचण काय ?

दुसरा डोस घेतल्यास आतील रिसेप्टर्स व्हायरसने शरीरात प्रवेश करताच सिस्टमला सतर्क करतात व कोविड संक्रमणापासून वाचवतात, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून सतत सांगितली जात आहे. पण, निष्काळजीपणा व केंद्रात जाऊन एक-दोनदा परत आल्याने आलेली नकारात्मकता, आदी कारणे दुसरा डोस घेण्यास अडचणी निर्माण करीत आहेत.

पहिला घेतल्यास दुसरा डोस मिळतोच
दुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळतोच, असा दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी स्वत: व कुटूंबाच्या आरोग्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

Web Title: Many did not take the second dose of the vaccine even after the deadline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.