सहा मिनिट वाॅक टेस्टचा अनेकांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:36+5:302021-04-19T04:25:36+5:30

चंद्रपूर : कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांची चिंता आता वाढली आहे. दरम्यान, ६ मिनिट वाॅक ...

Many are getting support for the six minute walk test | सहा मिनिट वाॅक टेस्टचा अनेकांना मिळतोय आधार

सहा मिनिट वाॅक टेस्टचा अनेकांना मिळतोय आधार

चंद्रपूर : कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांची चिंता आता वाढली आहे. दरम्यान, ६ मिनिट वाॅक टेस्ट ही चाचणी सद्यस्थितीत नागरिकांना आधार देत आहेत. घरच्या घरी होणारी ही चाचणी जिल्ह्यात अनेक जण करीत असून रुग्णांलयामध्येही रुग्णांकडून करून घेतली जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यासाठी सातत्याने जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही घरच्या घरी आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे की नाही याच्या तपासणीसाठी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.यासाठी ६ मिनिटे चालण्याची ही एक सोपी आणि घरगुती पद्धत आहे. ही चाचणी रक्तातील ऑक्सिजनची कमतरता जाणून घेण्यास मदत करते. यामुळे योग्यवेळी रुग्णालयात उपचार घेणे सोपे होते.

अशी करा चाचणी

आपल्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करा, त्यानंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात पायीच स्टाॅपवाॅच लावून सहा मिनिटे फिरा. फिरताना अतिवेगाने किंवा अतिस्थिर फिरू नका. सहा मिनिटे सतत स्थिर गतीने चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.

बाॅक्स

कुणी आणि कुठे करायची चाचणी

ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोनाची इतर लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी किंवा घरगुती विलगीकरणात असलेल्यांनाही करता येते. चाचणी कुठल्याही कडक जमिनीच्या पृष्ठभागावर करावी, चाचणी करताना जमीन चढ, उतार किंवा पायऱ्याची नसावी याची काळजी घ्यावी.

बाॅक्स

...तर काळजी घ्या

रक्तातील ऑक्सिनजची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा ३ टक्क्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल.

सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे होत असेल तर ऑक्सिजन कमी पडतो असे समजून जवळच्या रुग्णालयात किंवा डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाॅक्स

काळजी करू नका

सहा मिनिटे चालल्यानंतरही रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर तब्बेत अगदी ठीक आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करू नका. दिवसातून दोन वेळा चाचणी करावी.

बाॅक्स

असे लागणार साहित्य

घड्याळ, स्टाॅपवाॅच (मोबाईल फोन), पल्स ऑक्सिमीटर

कोट

सार्वजनिक आरोग्य विभागाने ६ मिनिट वाॅक टेस्टसाठी जनजागृती सुरू केली आहे. जिल्ह्यामध्येही यासाठी जनजागृती केली जात आहे. रुग्णालयातील रुग्णांकडून ती करवून घेतली जात आहे. आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे की नाही, याचे परीक्षण करण्यासाठी नागरिकांनी ही चाचणी घरच्या घरी केल्यास आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकेल.

-राहुल कर्डिले

मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर

Web Title: Many are getting support for the six minute walk test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.