मनुप्रणित व्यवस्थेने स्त्री अस्तित्व दुबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:27 IST2017-12-26T23:27:00+5:302017-12-26T23:27:20+5:30
निसर्गाने स्त्रियांना निर्मितीक्षम बनविले आहे. या आंतरिक क्षमतांचा उपयोग करून महिलांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा करून आपले कर्तृत्व दाखवून दिले व राष्ट्राची उद्धारशक्ती बनली.

मनुप्रणित व्यवस्थेने स्त्री अस्तित्व दुबळे
आॅनलाईन लोकमत
चिमूर : निसर्गाने स्त्रियांना निर्मितीक्षम बनविले आहे. या आंतरिक क्षमतांचा उपयोग करून महिलांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा करून आपले कर्तृत्व दाखवून दिले व राष्ट्राची उद्धारशक्ती बनली. परंतु येथील मनुप्रणित व्यवस्थेने महिलांचे अस्तित्व कवडीमोलाचे व दीनदुबळे बनविण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले.
महिलांच्या उन्नतीसाठी महिलांचे सभा संमेलन घडवून आणावे, विचार, सुख, दु:ख मांडावेत, त्यांच्यासाठी वाचनालये असावीत, जातीभेद, अंधश्रद्धा दूर सारून त्या संघटीत व्हावेत यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर क्रांतीभूमी येथे राष्ट्रसंतांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त महिलांच्या सबलीकरणाची अजुनही आवश्यकता का आहे? या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूरच्या नगराध्यक्ष शिल्पाताई राचलवार, यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चिमूरच्या प्राचार्य रेखा जोशीराव होत्या. मार्गदर्शक म्हणून नगरसेविका छाया कंचर्लावार, डॉ. शोभा नवले, वेणूताई सहारे, रेखा शिंगरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली चंदनखेडे यांनी केले. तर आभार मंदा कुंटेवार यांनी मानले. या कार्यक्रमाला चिमूर परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.