मनपातर्फे इंदिरा गांधींना आदरांजली
By Admin | Updated: November 2, 2015 00:57 IST2015-11-02T00:57:35+5:302015-11-02T00:57:35+5:30
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री...

मनपातर्फे इंदिरा गांधींना आदरांजली
चंद्रपूर : देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ आॅक्टोबरला चंद्रपूर शहर महानगरपालिकेत साजरी करण्यात आली.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता बस स्टँडजवळील प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांचे पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर सकाळी ११ वाजता महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, झोन क्रमांक एकच्या प्रभाग सभापती अंजली घोटेकर, माजी स्थायी समिती सभापती रितेश तिवारी, नगरसेवक विनयकुमार जोगेकर, आयुक्त सुधीर शंभरकर, उपायुक्त डॉ.विजय इंगोले यांचे हस्ते इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, नगर सचिव अब्दुल फैज तसेच मोठ्या संख्येने पालिकेतील कर्मचारीवृंद उपस्थित होते. (प्रतिनिधी)