माणिकगड विकासाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:34 IST2018-09-16T22:33:57+5:302018-09-16T22:34:22+5:30
गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

माणिकगड विकासाच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.
माणिकगड किल्ला, विष्णू मंदिर, शंकरदेव मंदिर, अमलनाला प्रकल्प ही प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी चंद्रपूर, यवतमाळ, आदिलाबाद, नागपूर, गडचांदूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात सहकुटूंब येतात. मात्र माणिकगड किल्ल्यावर सुविधा नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत असतात. सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. माणिकगड किल्ल्याच्या विकासासाठी तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडून विकास निधी मंजूर करून घेतला. त्यातून बरीच विकास कामे झाली आहे. मात्र अजूनही बरीच विकास कामे शिल्लक आहे. माणिकगड किल्ल्यापर्यंतचा कच्चा रस्ता मुसळधार पावसाने खराब झाला आहे. सिमेंट रस्ता करणे गरजेचे आहे. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी लावली आहे. मात्र ती दुर्लक्षित आहे. सर्वत्र गवत वाढलेले आहे. विकास कामांसाठी आणखी निधी हवा आहे.
चंद्रपूर येथून माणिकगड किल्ला बघण्यासाठी कुटुंबासह आलो. किल्ला खुप सुंदर आहे. मात्र स्वच्छता नसल्याने त्रास होतो. परिसर स्वच्छ असावा व किल्ल्यावर फिरण्यासाठी सिमेंट रस्ते तयार करणे गरजेचे आहे.
-अजित गेडाम, एक पर्यटक
माणिकगड किल्ला पुरातन असून विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. या किल्ल्याचा विकास होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
- इबादूल हसन सिध्दीकी,
घुग्घुस