लग्न सोहळ्यातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:38+5:302021-02-23T04:43:38+5:30

दुर्गापुर वेकोलि वसाहतीतील बौद्ध विहारात रिसेप्शनकरिता आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी पळविल्याची घटना ...

Mangalsutra was snatched from the woman's neck during the wedding ceremony | लग्न सोहळ्यातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले

लग्न सोहळ्यातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले

दुर्गापुर वेकोलि वसाहतीतील बौद्ध विहारात रिसेप्शनकरिता आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी पळविल्याची घटना शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.

ऊर्जानगर वसाहतीतील सुकेशना मेश्राम या शनिवारी वेकोलि वसाहतीतील बौद्ध विहारात रिसेप्शन करिता आल्या होत्या. रात्री सव्वा अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पळ काढला. हे मंगळसूत्र एक तोळ्याचे असून त्याची किंमत अंदाजे तीस हजार रुपये आहे .

याबाबत दुर्गापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.यावरून दुर्गापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 392 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Mangalsutra was snatched from the woman's neck during the wedding ceremony