शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

मित्राच्या वादात मध्यस्थीला गेला अन् जीव गमावून बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 14:06 IST

बल्लारपुरातील घटना : पाच जणांना अटक; एक गंभीर जखमी

बल्लारपूर (चंद्रपूर) : पैशाचा वाद झाल्यानंतर ते सोडविण्यासाठी मित्रासोबत मध्यस्थी करताना एका युवकाचा मारहाणीत बळी गेल्याची दुर्दैवी घटना ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री १०:३० वाजता टेकडी परिसरातील विद्यानगर वॉर्डात घडली. ललित तोडसाम असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली. एका जखमीवर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

टेकडी परिसरातील एका मित्राच्या बहिणीकडून एकाने पैसे उसने मागितले होते. ते परत मागण्यासाठी शीतलचा पती आरोपी रितिक याने वाद घातला. दरम्यान, हा वाद सोडविण्यासाठी ललित तोडसाम व अमोल देवगडे हे दोघे गेले होते. तू आमच्या मधे कशाला पडतो, असा प्रश्न उपस्थित करून रितिक आणि साथीदारांनी ललित तोडसाम व अमोल देवगडे यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात ललित हा गंभीर झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अमोल देवगडे याच्यावर उपचार सुरू आहे. मृताच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार केल्याने शांतीनगर वॉर्डातील आरोपी रितिका भीमराव गवई (२२), सौराब खान हाजी अब्दुल सुभान खान (३४), आशा भीमराव गवई (४५), शीतल रितिक गवई (२०), बंडू पांडुरंग नगराळे (४७) विद्यानगर वॉर्ड यांच्याविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८,१४९, ३०२, ३०७, ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर