शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अन् बोहल्यावर चढण्यापूर्वीच 'त्याला' मृत्यूने कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 11:15 IST

आशिष व समीर हे आपल्या मोटरसायकलने ब्रह्मपुरीला येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर समीर हा गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्दे आनंदाचा क्षण काळाने हिरावून घेतला

चंद्रपूर :मृत्यू कसा आणि केव्हा येईल, हे आपल्या हाती नसते. पण उभ्या आयुष्यात आनंदाची क्षणे आपल्या नशिबी येणार, याची वाट बघत असतानाच मृत्यू येणे यासारखे दुर्दैव ते कोणते. अशी हदयद्रावक घटना ब्रह्मपुरीच्या गोसीखुर्द कॅनलजवळ रविवारी घडली. एका चारचाकी वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. यात एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.

आशिष मुळे (२५) रा. खरबी असे मृतकाचे नाव असून त्याचे फेब्रुवारी महिन्यात लग्न होऊ घातले होते. यात दुचाकीवरील समीर बागडे (२१) रा. माहेर हा गंभीर जखमी झाला आहे. आशिष मुळे यांचा गौण खनिज वाहण्याचा व्यवसाय होता. त्यांचे लग्न येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातले होते. घरी आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तारीख जवळ आल्याने खरेदीला वेग आला होता. पण काळाने हे क्षण हिरावून घेतले व लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच आशिषला रविवारी मृत्यूने कवटाळले.

आशिष व समीर हे आपल्या मोटरसायकलने ब्रह्मपुरीला येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर समीर हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर बोलेरोचा चालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, वाहतूक पोलीस राहुल लाखे, पोलीस अंमलदार संदेश देवगडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू